Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Anil Shinde

Inspirational

4.0  

Anil Shinde

Inspirational

डॉ. बाबासाहेब आंबेडकर.. क्रांतीसूर्य

डॉ. बाबासाहेब आंबेडकर.. क्रांतीसूर्य

1 min
279


💙💙💙💙💙💙

दलितांच्या उद्धारार्थ

क्रांतीसूर्य जन्मा आला

दूर अंधार सारून

खरा कैवारी हो झाला....

💙💙💙💙💙💙💙

ग्रंथ हेच गुरू असे

मानणारे विद्याप्रेमी

घराचेही ग्रंथालय

करणारे ग्रंथप्रेमी....

💙💙💙💙💙💙💙

दिला मंदिर प्रवेश

पाणवठा केला खुलां

मिळवून दिली शिक्षा

खास अस्पृश्यांच्या मुलां....

💙💙💙💙💙💙💙

अन्यायाविरुद्ध वाचा

जातीभेदाचाही नाश

सोडविला त्यांनी खरा

अज्ञानाचा दुष्ट पाश....

💙💙💙💙💙💙

घटनेचे शिल्पकार

मसुदेचे रचयिता

न्याय,समता,बंधूता

दीन दलितांचे पिता...

💙💙💙💙💙💙

सत्याग्रहे आंदोलने

मार्ग अनेक शोधले

दुःखितांच्या हक्कासाठी

जुने नियम मोडले....

💙💙💙💙💙💙

समाजात प्रबोधन

करण्याची धैय्यपूर्ती

बाबा ते आंबेडकर

गुणवान न्यायमूर्ती....

💙💙💙💙💙💙


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational