STORYMIRROR

ANIL SHINDE

Others

4  

ANIL SHINDE

Others

मराठी असे मायबोली

मराठी असे मायबोली

1 min
247

माय मराठीचे गाऊ किती गुणगान 

आहे जगात भाषा माझी महान ॥धृ


ऱ्हस्व दिर्घ वेलांटी मात्रा काना उकार 

पूर्ण स्वल्पविराम अवतरण अनुस्वार 

छंद वृत ओव्या गझल शोभे अलंकार 

मायबोली गौरवशाली आमुची शान ॥१


सदतीस अक्षरे व चौदा स्वरमाला

शब्दांच्या सुंदर गुंफल्या सर्व माला

कविता लालित्य कथा भावती मनाला 

व्याकरण शुध्दतेचे ठेवते नित्य भान ॥२


अभंग गाथा थोर तुकोबारायांचे

गवळण भारूड संत एकनाथांचे 

ज्ञानोबा अमृतकण पाजती ज्ञानाचे

लिळाचरित्र विवेकसिंधू ग्रंथ छान ॥३


स्वयंभू समृध्द परंपरेला जपणारी 

विविध भाषानां तरीही स्विकारणारी 

मर्द मराठ्यांच्या मातीत नांदणारी

संस्कृतपेक्षा आदीम ठेवू तिचा मान ॥४


जात्यावरल्या त्या ओवीत दिसते 

भूपाळी भजनात मंदिरी वसते

लावणी लोकसंगीतात सजते 

गौरवशाली वैभव भाषेचा अभिमान ॥५


बारा कोसावर बोलीभाषा नांदते 

खेडोपाडी राऊळी किर्तनी दंगते 

नृत्य नाट्य कला विज्ञानात रंगते 

उच्च दर्जाचे लिखाण वाढवते ज्ञान ॥६


Rate this content
Log in