मी मराठी शाळा बोलते
मी मराठी शाळा बोलते
*किती दिवसांपासून बंद*
*आहे माझी मराठी शाळा*
*आता कोण घेणार झाडून नि*
*पुसत असेल तो काळा फळा?*
*माझ्या मराठी शाळेच्या भोवती*
*किती झाली असेल ना घण?*
*चिमण्याही ठेवून असतील नजर*
*खिडक्यांकडे एकटक ते ध्यान!*
*पाण्याविना सुकली ना आता*
*परसातील फुले नि वेली झाडे*
*कोण म्हणत असतीलआता ते*
*भिंतीवरचे रंगीत संगीत पाढे?*
*ना कोणी आता मित्र भेटती*
*हरवली आता ती दंगामस्ती*
*जरी मिळाली एवढी ही सुटी*
*आली मला आता खुप सुस्ती!*
*असतील कुठे आता माझे*
*गुरुजी ,बाई नि माझी शाळाईँ*
*झालिया आता माझ्या मनाला*
*त्यांना भेटण्या मला झाली घाईँ!*
*आता सारखे मला असे वाटते*
*उघडावी माझी लाडकी शाळा*
*बोलक्या भिंतीचा लागला जीव*
*पुन्हा लागावा मला शाळेचा लळा*
*ऑनलाइन ही आता असे शाळा*
*जरी झाली ती मोबाईलवर सुरू*
*कितीही समजवून मला समजेना*
*गृहपाठ सांगाव कसा पूर्ण करू?*
*शाळेमध्ये मिळत होता कधीतरी*
*मिळत होता बाई-गुरुजींचा मार*
*पण सांगा खरं बाईं-गुरुजींविना*
*कसे होतील हो मुलांवर संस्कार*
