STORYMIRROR

ANIL SHINDE

Inspirational

3  

ANIL SHINDE

Inspirational

पर्यावरण संवर्धन

पर्यावरण संवर्धन

1 min
252

वृक्ष आहे देवदूत 

वृक्षसंवर्धन करू 

वृक्षारोपण लावून 

कर्तव्याची आस धरू


वसुंधरा नमन करून 

वाढविते जगात संपत्ती 

प्लॅस्टिक वापर न करता

नाही होत जगी विपत्ती 


वाढेल ऑक्सिजन

पशू पक्षींना निवारा 

प्रदुषण होईल नष्ट 

झाडांमुळे मिळेल वारा


पृथ्वीवरच निसर्ग सौंदर्य 

सुजलाम सुफलाम असेल 

मैत्री करू पर्यावरणाशी

काहीही तोटा नसेल 


वृक्ष महत्व पटवून 

सार्थक करून जीवनाचे 

झाडे लावा झाडे जगवा

संदेश देऊ या धरतीचे


प्रदूषण नियंत्रण करू 

जलचरी नभावरी 

शुध्द हवा पृथ्वीवर

असे हीच वनचरी 


झाडाचा मंजूळ वारा

एक एक रोप लावू या

सावली पाखरांना 

निसर्गाचे नाते जपू या 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational