STORYMIRROR

ANIL SHINDE

Others

3  

ANIL SHINDE

Others

वेड प्रेम

वेड प्रेम

1 min
270

वेड प्रेम माझं कसं 

 तुझ्याच साठी झुरते 

 वाटेवर तुझ्या प्रिया

 पाऊलखुणा शोधते 

      

वेड मन माझं कसं  

फुलपाखरू बनते 

तुझ्या अवतीभवती 

उड- उडत असते

    

 वेड प्रेम माझं कसं 

 तुझ्या स्वप्नात रमते

 स्वप्नामध्ये दिवसभर

 तुझ्या मिठीत असते 

      

वेड प्रेम माझं कसं 

तुझ्याच साठी जागते 

आकाशातील चांदण्या 

रात्रभर मोजत असते

    

वेड प्रेम माझे कसे

तुला शोधत असते 

तू सोबत नसताना 

तुझ्याच सोबत असते       


Rate this content
Log in