बोलीभाषा मराठी
बोलीभाषा मराठी
हे शिव सुंदर समर शालिनी
*बोलीभाषा* *मराठी* माऊली
युगा युगांची जीवन गंगा
माते उदे तुझ्याच पाऊली
*मराठी बोलीभाषा* आमुची
आहे महाराष्ट्राची हो शान
भजन कीर्तन भारुड,अभंग
ऐकताच हरपून जाते भान
*माझ्या बोलीभाषेचे* अमृत
प्राशेल तो होईल भाग्यवंत
तिचा नाही कधी दूजाभाव
असो कोणताही त्याचा पंथ
या काळाच्या भाळा वरती
माते तेजाचा तू लाव टिळा
आणि फुलू दे मराठीतून
मानवतेचा इथे दिव्य मळा
तुझ्याच साठी गुंफित बसते
सखे मोहनमाळ शब्दांची
अर्थ साजरा गंध लाजरा
माते नवलपरी पण रंगांची
*माय मराठी* तुझिया पायी
तन मन धन मी अर्पियले
तुझिया नामी तुझिया धामी
माते अखंड रंगुनी राहियले
