शांतीदूत बुद्ध
शांतीदूत बुद्ध
💐💐💐💐💐💐
पाहुनी जगी दुःख
हृदय गेले हेलावूनी
शांतीदूत बनले बुद्ध
स्वयंप्रकाशित होवूनी
संदेश देऊनी शांतीचा
जाहले उभ्या जगाचे स्वामी
उद्धार करुनी प्राणिमात्रांचा
बुद्धम् शरणम् गच्छामि
प्रज्ञा शील करुणेची
अनं तत्वे पंचशीलाची
कळली जयास वाणी बुद्धांची
लाभली प्रचिती आत्मशोधाची
काम- क्रोध -लोभ -मोह -मत्सर
तिलांजली त्यास देऊनी
दश -दिशा उजळवली
चेहऱ्यावरी तेज समाधानी
शांतिदुताचा प्रसार व्हावा
नको जगी या युद्ध
बीज पेरूनी विचारांचे
पुन्हा जन्मावे बुद्ध
💐💐💐💐💐💐💐
