घन
घन
1 min
213
घन निळे सावळे
आभाळी दाटले
शुभ्र मोती घेऊन
गगनी मेघ बसरले!!१!!
ओंजळीत येता
सरीस हे पंख नवे
दशदिशांत अंबरात
हिरवाईचे गुणगाण!!२!!
मनाच्या शिल्पांवरी
प्रतिबिंब पावसाचे
निर्झरापरि वाहते
शब्दमधूर काव्य!!३!!
शब्द माझे ओठी
काव्यशिंपले नभीं
ओसंडून वाहे अंगणी
मनाची ही प्रीती !!४!!
ढगांच्या गावातंल्यां
मोत्यांच्या या राशी
पाऊस म्हणूनि दारी
येई श्रीरंग गोकुळी !!५!!
