प्रेमाचा पाऊस
प्रेमाचा पाऊस
अनेक पावसाळे
आले आणि गेले
पण त्या पावसासारखे
पावसाळेच नाही झाले
पाऊस आपल्या
गोड आठवणीतला
तुझ्या माझ्या प्रेमाची
साक्षी असणारा
आज ही आठवतो
मला तो पाऊस
छत्री एकच होती
त्यात भिजायची हाऊस
छत्री अन् पावसाच्या नादात
घर कधी आल कळल नाही
माझ हृदय पाण्यात विरुन
कधी तुझ झाल उमगल नाही
तु जरी नसला तरी
विरहाचा पाऊस असतो सोबती
तोच आठवून देतो की
होती कधी आपुलेही नाती
❤❤❤
