STORYMIRROR

Chhaya Sunil Gade

Inspirational

3  

Chhaya Sunil Gade

Inspirational

स्त्रीची व्यथा

स्त्रीची व्यथा

1 min
218

स्त्री म्हणजे आदिशक्तीचे रूप, 

स्त्री म्हणजे धनलक्ष्मीचे रूप, 

स्त्री म्हणजे विद्यादेवीचे रूप, 

आई,बहिण,पत्नी,मुलीचे रूप.


मुलगी बनून बागडते,  

माता- पित्याच्या दारी. 

सून बनून नांदते,  

सासू-सासऱ्यांच्या घरी. 


पत्नी बनून फुलवते,  

संसाराची बाग सारी. 

आई बनून स्वीकारते,  

सर्व मुलांची जबाबदारी. 


एवढं सारं सांभाळते,  

तरी ती उपेक्षितच असते. 

सर्वांना एकच वाटते,  

तिला काही कळतच नसते. 


तिलाही थोडीशी प्रेमाची,  

आपुलकीची गरज असते. 

इतर कोणत्याही गोष्टीची,  

जास्त अपेक्षा नसते. 


फक्त मदर्स डे, वुमेन्स डे,    

सिस्टर्स डे, डॉटर्स डे. 

या दिवशीच तिची,  

आठवण काढली जाते. 


त्यापेक्षा तिचा प्रत्येक डे,    

आनंदात घालवणे, 

हीच तिची सर्वांकडून  

माफक अपेक्षा असते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational