आपुली मायमराठी
आपुली मायमराठी
माझ्या मराठीची
अवीट गोडी
सर्वांनी चाखावी
मनापासून थोडी
ज्ञानेश्वरांनी गायली
मराठीची थोरवी
तुकारामांनी रचली
अभंगाची ओवी
कुसुमाग्रजांच्या लेखनीने
मायमराठी सजली
लतादिदींच्या मधुर वाणीने
गाणी सारी नटली
मराठी अमुची राजभाषा
त्यात नाना बोली
अर्थपूर्ण त्यात भावना
रानवा-यात भिजली
आपुल्या मायमराठीचे
किती कौतुक करू
तिच्या नित्य संवर्धनाची
आपण कास धरू
