माझी मुक्ताई
माझी मुक्ताई
माझी आई मुक्ताई माऊली
तिची लेकरांवर मायेची सावली ॥धृ॥
मुलांच्या शिक्षणासाठी ना घेतली कधी माघार
अपार कष्ट केले तिने आमच्यासाठी फार .
पतीच्या खांद्याला खांदा लावून केला संसार,
लेकरांवरही केले तिने उत्तम संस्कार.
आई तू कधी नाही केला स्वतःचा विचार,
जीवन जगताना नाही घेतला कुणाचा आधार.
कष्टाने, धैर्याने केली सगळी संकटे पार ,
नातवंडांवरही केले नि:स्वार्थपणे प्रेम अपार.
संकटांना, दुःखांना सामोरी गेली फार,
तिच्या सामर्थ्याचा आम्हीही केला स्विकार.
तिच्याकडून शिकलो आम्ही एक विचार,
"दुःख पेलावे कसे आणि पुन्हा जगावे कसे "
हेच जीवनाचे सार.
ईश्वराकडे आता मी एकच मागणे करी,
देशील का रे जन्म देवा
पुन्हा माझ्या आईच्या उदरी ,माझ्या आईच्या उदरी......
