गुढीपाडवा
गुढीपाडवा
चैत्र महिन्याची वाजली तुतारी,
लेऊनी नववर्षाची उमेद न्यारी.
चाहूल ऋतू वसंताची,
पालवली सृष्टी सारी.
मधुर तान कोकीळेची,
ऐकायला वाटते भारी.
नवचैतन्याची, समृद्धीची ,
गुढी उभारू घरी.
समाधानाच्या फुलांची,
तोरणे लावू दारी.
कडुनिंबाच्या पानांस,
असतो उच्च मान.
नित्यनेमाने खाऊन,
आरोग्य होईल छान.
साखरेची गाठी,
वाढवते गोडी,
स्नेहाची गुढी,
उभारू या मनी.
गुढीवर उलटा,
तांब्याचा लोटा.
विनयशील व्हा,
ना आनंदाचा तोटा.
अंगणी सजली,
सुरेख रांगोळी.
वाईट विचारांची,
करू या होळी.
सामाजिक बांधिलकीची,
नवगुढी उभारू.
कोरोना महामारीची,
भीती दूर करू.
करू या सारे संकल्प
पाडव्याच्या या शुभदिनी,
भेदभावाचे विकल्प,
ठेवायचे नाही मनी.
कोरोनारूपी राक्षसावर
धैर्याने मात करू,
लसीने साऱ्या जगावर
अधिराज्य करू.
