अस्तित्व
अस्तित्व
आकांक्षाचे पंख लावून
गगन भरारी घे जरा
दुःखात होरपळुन झाले
जमिनीवर पंख पसर जरा…..१
हातात शिक्षणाचे चक्र
फिरवून दिशा दाखव जरा
माझे अस्तित्व मीच आहे
मिटवून टाक अंधकार सारा…..२
बंधनाची बेडी सोडव आता
मुक्त विहार कर हवेतूनी
स्वच्छंद जीवन जग आता
जगण्याची कला मानातुनी…..३
बदल तू स्वतःला सावरून
असहायतेच्या पाशातुनी
कालीचे रूप धारण करुनी
रक्षण जर स्वतःचे संकटातूनी…….४
