क्रांतीकारी आंबेडकर
क्रांतीकारी आंबेडकर
नमन या आधुनिक भारताचे शिल्पकारास
'सर्वश्रेष्ठ' भारतीय गाजे नावलौकिक जगभरी
महिलांचे समर्थक, महामानव आंबेडकर
दलितांचे कैवारी , स्वातंत्र्याचे पुजारी.
सपकाळ ते आंबेडकर चा यातनादायी प्रवास,
'शिपाई नाही, पाणी नाही' ओरबाडे बाल मनास,
स्पृश्य-अस्पृश्य तिरस्काराचा तिढा ना सुटे या वयास,
शिक्षणाच्या ध्यासाने देई चालना बुद्धी जीवास.
घेऊन पदवी, लिहिला प्रबंध, दोष देई ब्रिटिशास
भारतीयांची पिळवणूक, दाखवून देई अंदाजपत्रकात,
स्वातंत्र्य, समता, बंधुता तत्त्व स्वीकारे महावक्ता,
लिहूनी शोधप्रबंध मांडले स्वविचार धोरणात.
बनूनी कर्तव्यदक्ष व उत्तम नागरिकाचे रूप
प्रज्ञा, शील, करुणा, सांगे भीमा अंगी बाळगण्यास.
करुनी खोल विचार पाहुनी समाज स्वरूप,
बसूनी ग्रंथालयात भीमा करे अभ्यास तास न तास.
लढे देण्यास आकार आणि दिशा, करी कामगिरी भरीव
जननी समस्येची ही जातीव्यवस्था आणुनी संपुष्टात.
मूकनायकातून देई विचार, बुरसटलेल्या लोकास,
घेऊनी विचारक्रांती, सांगे फेरबदल करण्यास, आचरणात.
'शेतमजूर समृद्ध, तरच देश समृद्ध' ललकारी भीमा,
दाखवे खोऱ्यांची विभागणी, लांबी, खोली, दूरदर्शीपणा.
स्थापून 'स्वतंत्र मजूर पक्ष' ओळखी राजकीय सत्ता,
करुन प्रवास राजकारणाचा लिहिली भारतीय राज्यघटना.
फुले-आंबेडकर स्त्रीमुक्तीचे पक्के समर्थक ,
देई क्रांतिकारी विचार समाज सुधारणेतून.
बदलण्यास हिंदू ची मानसिकता करून धर्मांतर,
आंबेडकर चळवळीस मिळे गती महा क्रांतीकार्यातून.
