STORYMIRROR

jaya munde

Inspirational

3  

jaya munde

Inspirational

भोंदूबाबा

भोंदूबाबा

1 min
209

सांग, सांग भोंदूबाबा

 प्रारब्ध हसेल काय?

 जीवनी सुख फुलण्या

 गंडे, दोरे बांधशील काय..!!धृ!!


 भोंदूबाबा, भोंदूबाबा

 जंतरमंतर कर,

 कोंबडे, बकरे तुला

 हवे तर धर

 पण जादूटोण्याने कोरोनाचे 

 संकट टळेल काय...!!१!!


  भोंदूबाबा, भोंदूबाबा

  जादू अशी करशील का,

  देवाघरच्या आजीला

  परत तू आणशील का?

छू-मंतरने माझे हर काम होईल काय....!!२!!


 भोंदूबाबा, भोंदूबाबा

 खरे सांग एकदा,

 मंत्र-तंत्राने तू किती

 कमवलीस संपदा?

 तूच तुझे प्रारब्ध सांग बदललेस काय...!!३!!


 भोंदूबाबा, भोंदूबाबा

 सांग साऱ्या जगास,

 अंधश्रद्धेचा भस्मासूर

कर आता खल्लास

विज्ञानाच्या कसोटीवर तू तारशील काय....!!४!!


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Inspirational