इतिहास
इतिहास
नव्या दिशेने इतिहास पाहू
चला आपणही जिजाऊ होऊ।।
कथा सांगुनी पराक्रमाच्या
सद्गुणांच्या,सदाचाराच्या
आपल्या लेकरात शिवबांना पाहू
चला आपणही जिजाऊ होऊ।।
असे परस्त्री मातेसमान
साडीचोळीचा बहिणीस मान
आदराची ही दृष्टीही देऊ
चला आपणही जिजाऊ होऊ।।
करीता मुलीस आत्मनिर्भर
भक्षक कापे उभा चरचर
स्वाभिमानाची तलवार उगारु
चला आपणही जिजाऊ होऊ।।
झंझावात झालाय सुरू
माँ जिजाऊंचे स्मरण करू
सुसंस्कारीत पिढीला घडवू
चला आपणही जिजाऊ होऊ।।
