STORYMIRROR

Manisha Bhagwan Sawle

Abstract Inspirational

3  

Manisha Bhagwan Sawle

Abstract Inspirational

शृंगार

शृंगार

1 min
266

कविता सदैव माझा शृंगार होत जावा

तो सूर भावनांचे झंकार होत जावा


काचावला कधी तो धागा जरा जरासा

धास्तावल्या पतंगा आधार देत जावा ||


वाऱ्यासवे उडाली कित्येक झापे त्यांची

झापात मोडक्या या संसार होत जावा


जो गंध सांडलेला रात्रीतल्या कळ्यांनी

स्वप्नात त्या फुलांनी आकार घेत जावा


हिंदोळल्या तरुने लाटेस पांघरावे

भिजल्या मनासही तू होकार देत जावा 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract