मायमराठी
मायमराठी
माझी माय हो मराठी
तिची जगभर ख्याती
जिचा डंका वाजे चौफेर
वाणी ऐकावी सुस्वर।।
माझ्या माय मराठीत
सर्व भाषांचा आदर
तिच्या पदरावरी शोभे
बोलीभाषांची किनार।।
माय मराठी हो माझी
नेसे भरजरी शालू
किती सजली,नटली
तीला जगात मिरवू।।
माय मराठीचा दिन
वंदू गुणगान मुखे
करू आदर गौरव
नांदे बोलीभाषा सुखे।।
बोली माय मराठीची
किती गाऊ मी थोरवी
गीत गाईन कौतुक
झळके पताका गगनी।।
