श्रावण सरी
श्रावण सरी
श्रावणाच्या सरी
बरसल्या उरी
संगे उसळल्या धारा
बेभान होऊनी
कैसा लगाम घालू
मनी वारुच्या
मन धुंद माझे
अजुनी होई कासावीस
बरसत्या धारांनी
पुढं पुढचं धावत
मागे खेचता येईना
उगा वेड लावी
कैसी घालमेल जीवा
लागली अंतरी..
चिंब मनाचा आसरा
जणू आधार लाभला
सवे आसवांच्या डोही
मनी उठला फवारा
आसवांनी भिजली कथा
कधी न कळलेली
मनीची अव्यक्त व्यथा..
