आभाळ
आभाळ
ठेचाळल्या मनाचे आभाळ सांधतांना,
दाटून मेघ आले प्रेमात थांबतांना..
हातात हात घेता ती वेदना हसावी,
तू शब्द सांत्वनाचे कानात सांगताना..
जाणीव यातनांची थोडी मनी नसावी.
संसार सावराया हा घाम सांडतांना.
टाहो फुटून छाती आता तुडूंब झाली,
कोणास मी पुकारू हा बांध घालताना.
वाऱ्यावरी घराला माझ्याच बांधताना,
मी सैरभैर झालो आधार शोधतांना..
