STORYMIRROR

Manisha Bhagwan Sawle

Abstract

3  

Manisha Bhagwan Sawle

Abstract

दिवाळी

दिवाळी

1 min
212

माणुसकीच्या दिव्यामध्ये

सद्भावनेची वात ठेवते

अंधाऱ्या मन गाभाऱ्यात

अगणित दिव्यांची दीपमाळ फुलते

त्या दिवशी खरी दिवाळी असते।।

  व्यथा जाणता दुसऱ्याची

 हृदय जेव्हा कळवळते

वेदनेने मग कोणाच्या

कडा डोळ्यांची पानावते

त्या दिवशी खरी दिवाळी असते।।

हा माझा तो तुझा परका

धर्म जातीची तर भिंतच नाते

सारे जण समान मजला

ही विश्वभावना निपजले

तेव्हा खरी दिवाळी असते।।

शेंदूरल्या दगडात कधीकधी

नसले देवपण तरी चालते

पण तुझ्यात नि माझ्यात 

जेव्हा माणूसपण दिसते

त्या दिवशी खरी दिवाळी असते।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract