क्षण
क्षण
मला भेटला माणूस
मन जोडावया आला
माणसातील माझ्या
माणूस शोधावया आला
दुःख अंतरी कोंडून
मला हसावया आला
दावुनी सौंदर्य जगीचे
जणू मोहवाया आला
येता संकट जीवनी
वाट दाखवया आला
नातं जपता सौख्याचे
क्षण तो असा आयुष्यात आला
मनी पाडून भुरळ
दुःख भुलवाया आला
सुखे वाटता वाटता
जगणं शिकवाया आला
