गुढी उभारू चैतन्याची
गुढी उभारू चैतन्याची
दिन पहिला चैत्रातला
वर्षातल्या पहिल्या सणाचा
साडेतीन मुहेर्तांपैकी एक
अशा गुढी पाडव्याचा.
*गुढी उभारू चैतन्याची*
मनात संकल्प चांगले धरू.
नव तेजाचे अन् उत्साहाचे
निराशेचे क्षण दूर करू.
संकल्पांचे जतन करूनी
वर्षभर ते अमलात आणू
जळमट सारी फेकून देऊ
नवे प्रकल्प कृतीत आणू.
कडू लिंबाची पाने खाऊ
निरोगी शरीर सदैव ठेऊ
नव्या कामाचे तोरण बनवून
अभिमानाने ते दारावर लाऊ.
पुजा-अर्चा प्रसन्नतेने करू
देव-देवतांचे कृपा हस्त घेऊ
सत्कर्माची कास हाती धरू
अडल्या नडल्यांना हात देऊ.
गुढी पाढव्याचा मंगल दिनी
विनवू देवतांना एकजुटीने
दूर करू या कोरोनाचे सावट
झालो सज्ज आम्ही हिमतीने.
