रंग वसंताचे
रंग वसंताचे
आगमन वसंताचे
चैत्र व फाल्गुन मास
सुरू निसर्ग उत्सव
वसंत पंचमी खास
लोभसवाणे सौंदर्य
मानवास आकर्षले
सोळा कलांनी फुलून
निसर्ग यौवन खुले
निसर्गाच्या सानिध्यात
विस्मरण वेदनांचे
चिरगामी परिणाम
देई रंग वसंताचे
बदलून निसर्गच
वसंत फुलून येई
निसर्ग प्रभू स्पर्शाने
हे जीवन धन्य होई
निसर्गाची सुंदरता
वसंताच्या संगीतात
मानवाची रसिकता
सूर मिळे या गीतात
