सुगरण
सुगरण
गळा आणि पोटावर पिवळ्या रंगाची उधळण
नदीकाठच्या जंगल शिवारात पहावयास मिळते सुगरण
इवलीशी चोच अन्
पायांची दोन बोट
काड्या काड्या गुंफुनी
नाजूक वीण असलेला
मजबूत देखणा
सुंदर खोपा बांधते ही सुगरण
जीव टांगणीला तरी पिल्ले झुलतात खोप्यात जणू मनोऱ्यावर
जिद्द, चिकाटी, मेहनत
असावी तर अशी
कधीतरी घ्याव हेही मनावर
खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा
विणकामाची निसर्गातील
अप्रतिम ही कलाकृती
ना कुठली योजना ना कुठली सजावट त्यांना माहिती
विणते चोचीने एक एक काडी
बांधते खोपा जणू बंगल्यापरी
अशी कला मानवाला ही लाजवी
सदैव प्रयत्नशील राहून ध्येयपूर्ती
करावी शिकविते आपल्याला ही सुगरणीची उत्कृष्ट कलाकारी 🙏😊
