आजी
आजी
त्या शुभ्र चादरीमधून
फक्त तुझा हात बाहेर
आलेला दिसत होता,
तुझ्याजवळ खोटा
आक्रोश करणारी
ती गर्दी मागे सारून,
मी तुझ्या जवळ आलो
आणि चादरीमधून
बाहेर आलेला तुझा हात,
हातात घेतला
तुझ्या अंगठ्याला स्पर्श झाला
आणि तु सांगितलेल्या
महाभारतातील
एकलव्य आठवला..
आणि मग
एकामागून एक आठव
एकामागून एक अश्रू !!
अजुन घडीभर तुझा हात
हातात ठेवावं म्हणलं,
तेवढ्यात गर्दीतून आवाज आला,
चला उचला रे आता..!!
तू जिवंत असताना,
एकदा तरी तुझा हात
घट्ट पकडायला हवा होता...
