नाही कोणीच कोणाचा
नाही कोणीच कोणाचा
कंटाळा आलाय मला
या कोरड्या जगण्याचा,
अन् अशाळभूत नजरेने
जीवनाकडे बघण्याचा.
फक्त दुःख नी दुःखच आहे,
नाही दुसरे काही,
जगतोय मी जीने पण
जगण्यात रामच नाही
असते कुठतरी मर्या दा
नाही छंद दुःख मज भोगण्याचा...
जगलो आशा ठेवून जन्मभर
मरत राहीलो क्षणाक्षणाला
भोगत राहीलो भोग सारे
सांगू दुःख माझं कुणाला..
माझा मलाच नाही भरोसा
क्षणभर आता जगण्याचा...
कसं जगावं काही कळेना
दुःखच सारं वाटयाला,
किती चालावी वाट अनवाणी
तुडवीत फक्त काट्याला..
सकारात्मक दृष्टीकोण होता
जीवनाकडे खूप बघण्याचा...
यावे मरण नी व्हावी सुटका
पुरे हे जीने मेल्याचे
मरुन जगतोय जीवन भर
जीवन हे ना जगायचे.
कुणासाठी जगावे उगीच
नाही कुणीच कोणाचा...
रडतोय मनात, हसतोय जनात
कसं सांगावं दुःख जगाला
ज्या जगाचा केला विचार
छळावे का त्यानेच मला.
मरण मागतो, मरण मीळेना
संपला भरोसा जगण्याचा...
खूप सोसलं, खूप भोगलं
जगलं दुःखीच जीवन सारं
खूप होत जगायचे पण
नाही भेटला जीवनाधार,
उरले नाही सरले सारे
काळ संपला रडण्याचा
जगात राहीलो जन्मभर
विचार करीत मरण्याचा..
आली जवळ ती मरणघटीका
माफी मागतो सगळयांची
पाप माझे सरले दोस्तहो
मिटे पापणी डोळ्याची...
सरणावरती चढलो मी
नको खांदेकरी, उपकार कोणाचा
नका म्हणू तो होता बरा
उपाय सापडला मरणाचा...
