STORYMIRROR

Tejaswita Khidake

Action

4  

Tejaswita Khidake

Action

बहिष्कार

बहिष्कार

1 min
336

कोटी मध्ये विकल्या जाती पक्षाची तिकिटे

सामान्यांना मूर्ख ठरवती, खेळीती डाव हे अपुले ..


पोटनिवडणुक अशीच केली, उभा नको तो उमेदवार

अन मग युद्धाच्या आधीच निश्चित होता निकाल रे ..


आता आली विधानसभा, खेळीला तोच डाव रे

विरोधात नाही मजबुत उमेदवार, जनतेची नाराजी रे ..


जागर व्हावा जनतेचा आता

दाखवुनी द्यावी शक्ती रे ,पाडूनी द्यावा डाव यांचा दाबुनी बटण नोटा चे ..


बटन दाबिता नोटा चे नेता ठरितो नालायक जी

होऊ न देई बोगस मतदान दाब तु बटन नोटा जी ..


निवडुनी येई तो जरी, हातात तुझ्या ही पावर रे

जिरवाया मक्तेदारी दिसु दे तुझी नाराजी रे ..


कर अर्ज, लिही तक्रार दे निवडणुक आयोगा तु

यंदा जनतेचा जागर हो, दे बहिष्कार या निवडणुकीस तु ..


होवो जगास माहित आता काय काय सहन केले तु,

नाही जर ऐकावया कुणी तुज संयुक्त राष्ट्राचा पर्याय हो ..


जाऊदे आता जागतिक पातळीवर

वाजुदे हा डंका हो ,हो जागा आता तु हो जागा आता तु ..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action