ढोंगी
ढोंगी
मी हरल्यासारखं करेन
तु जिंकल्यासारखं कर, पण तेवढं खोक्याचं ध्यानात ठेव .
मी रडल्यासारखं करेन
तु हसल्यासारखं कर, पण तेवढं टेंडरचं ध्यानात ठेव .
मी पडल्यासारखं करेन
तु उभं राहिल्यासारखं कर, पण तेवढं प्रोजेक्टचं ध्यानात ठेव .
मी जीव गेल्यासारखं करेन
तु जिवात जीव आल्यासारखं कर, पण तेवढं जमिनीचं ध्यानात ठेव .
मी खचल्यासारखं करेन
तु जोश आल्यासारखं कर, पण तेवढं पेट्यांचं ध्यानात ठेव .
मी येडं झाल्यासारखं करेन
तु मला येड ठरवल्यासारखं कर, पण तेवढं दुकानाच्या गाळ्यांचं ध्यानात ठेव .
मी हीन दर्जाचा असल्यासारखं करेन
तु प्रतिष्ठित असल्यासारखं कर, पण तेवढं केस च्या निकालाचं ध्यानात ठेव .
मी हरल्यासारखं करेन
तु जिंकल्यासारखं कर, पण तेवढं खोक्याचं ध्यानात ठेव .