STORYMIRROR

Tejaswita Khidake

Romance

3  

Tejaswita Khidake

Romance

कधी कधी नको वाटतं रे

कधी कधी नको वाटतं रे

1 min
354

हे असं, चोरून चोरून इंटरनेट वर तुझा फोटो बघणं,

अन् फोटो पाहता पाहता, हरवुन जाणं,

कधी कधी नको वाटतं रे .


हे असं, तुझं माझ्याशी नं बोलणं,

अन् माझीही तुझ्याशी बोलण्याची हिम्मत नं होणं,

कधी कधी नको वाटतं रे .


हे असं, ते आपले काँलेज मधले दिवस आठवणं,

अन् आपलं अजुनही अबोल, अव्यक्त राहणं,

कधी कधी नको वाटतं रे .


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance