STORYMIRROR

Harsha Lohe

Romance

3  

Harsha Lohe

Romance

!! आगळं वेगळं प्रेम !!

!! आगळं वेगळं प्रेम !!

1 min
447

प्रेम तुझं खरं आहे ,

माहीत आहे जगाला..

स्पर्श करतात शब्द ,

माझ्या निर्जीव मनाला...!!१!!


तुझ्या अबोल प्रेमाची ,

झाली सवय मला..

मन माझं जिंकलं तू ,

तुझी ही दुर्मिळ कला...!!२!!


सवय तुझ्या असण्याची ,

करून घेतली मी स्वतःला..

सतत तुझ्याच आठवणीत ,

साठवते माझ्या देहाला...!!३!!


डोळ्यातील अश्रू माझ्या ,

गुडूप झाले या काळोखात..

भाव दुःखाचे मी विसरले ,

तुझ्या प्रेमळ सहवासात...!!४!!


परीक्षा आपल्या प्रेमाची ,

तुझ्या माझ्या विरहाची..

होऊ नक्कीच पास आपण ,

घडी बसवू आयुष्याची...!!५!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance