STORYMIRROR

Harsha Lohe

Others

2  

Harsha Lohe

Others

निःस्वार्थ प्रेम

निःस्वार्थ प्रेम

1 min
40

निःस्वार्थ मनाच्या गाभाऱ्यात,

वसले स्वार्थी जनांचे गाव

दिसले नयनी त्यांच्या,

जणू दुष्टपणाचे भाव..!!१!!


निःस्वार्थ मनाच्या गाभाऱ्यात,

होता निर्मळ प्रेमाचा झरा

मान अपमान सहन करून,

केला मानाचा मुजरा..!!२!!


निःस्वार्थ मनाच्या गाभाऱ्यात,

नव्हतं स्वतःसाठी बळ

स्वार्थासाठी होई नेहमी,

गरिबीचा छळ..!!३!!


निःस्वार्थ मनाच्या गाभाऱ्यात,

भावनांचा कल्लोळ माजला

प्रेमापोटी लेकराला तिने

ममत्वाचा घोट पाजला..!!४!!


निःस्वार्थ मनाच्या गाभाऱ्यात,

आई जशी मायाळू

वडिलांशिवाय नाही कोणी,

कठोर असून दयाळू..!!५!!



Rate this content
Log in