STORYMIRROR

Harsha Lohe

Others

3  

Harsha Lohe

Others

उगाच का रडत बसावे

उगाच का रडत बसावे

1 min
197

ज्यांनी आयुष्यभर आपलं मन दुखावलं,

त्यांच्यासाठी उगाच का झुरत बसावं

ज्यांना आपली कदर, आपला आदर नाही,

त्यांच्यासाठी आपण उगाच का रडत बसावं..!!१!!


ज्यांनी नातं फक्त नावापुरतंच निभावलं ,

आपण त्या नात्यासाठी उगाच का अपेक्षा करत बसावं

समजून उमजून ज्यांनी आपल्याला दुःख दिलं,

त्यांच्यासाठी आपण उगाच का रडत बसावं..!!२!!


सुखी समाधानी साधं आयुष्य हवं होतं ,

यांनी उगाच का फुलांच्या नावावर काट्यांनी भरवावं

सकाळ संध्याकाळ अश्रूंना वाट मोकळी करून,

उगाच का यांच्यासाठी मी रडत बसावं..!!३!!


यांनी लादलेल्या अर्थहीन बंधनात,

उगाच का अडकून मी गुदमरून जगावं

जगण्याची आशा माझ्याजवळ असताना,

उगाच का यांच्यासाठी मी रडत बसावं..!!४!!


स्वतः अशिक्षित आहे म्हणून शिक्षणाला दोष देतात ,

उगाच का मग पैशाच्या जोरावर सुशिक्षितपण मिरवावं

दोष तर यांच्या संस्कारातच आहे,

उगाच का मग यांच्यासाठी मी रडत बसावं..!!५!!


Rate this content
Log in