नात्यांचा पुरावा
नात्यांचा पुरावा
1 min
52
कुटुंबात झाला जन्म,
पूर्वजन्मी केलं पुण्य
माता पिता झाले धन्य
उपकार ते अगण्य..!!१!!
प्रेम काळजी जिव्हाळा,
नव्या पिढीला मिळावा
रंग जरी गोरा काळा,
दिसे नात्यांचा पुरावा..!!२!!
जसा कणा कुटुंबाचा,
माझा कष्ट करी बाप
नाही आधार कुणाचा,
आई ओलांडते माप..!!३!!
भाऊ बहिण असावे,
अंगणात बागळती
जणू प्रेमळ भासावे,
अश्रू गाली ओघळती..!!४!!
लोभासाठी होतो जगी,
सर्वनाश हा नात्यांचा
पैशासाठी झाला सर्व
अंत मनी भावनांचा..!!५!!
