Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Harsha Lohe

Tragedy

4  

Harsha Lohe

Tragedy

!! चिंतारुपी चिता !!

!! चिंतारुपी चिता !!

1 min
366


जळणारी चिता तरी ,

मुक्त होते साऱ्या बंधनातून...

चिंतारुपी चिता मात्र ,

जाते जखमांच्या ज्वालातून...!!१!!


दुःख अनेक आले म्हणून ,

पळवाट कधी ना शोधली...

मोठ्यांचा सदा आदर करून ,

प्रेमाला तुझ्या सतत मुकली...!!२!!


माहेरचा कसा आधार घेऊ ,

झाली निराधार आई माझी...

जखमा तरी कोणाला दाऊ ,

वाट पाहते रोजच तुझी...!!३!!


काळजी, जिव्हाळा, प्रेम ,

सर्वच कसं संपलं... 

चिंतेचे सावट कायम ,

हसण्यामागे सगळं मिटलं...!!४!!


वेदना देऊन मोकळे झाले ,

पदरात माझ्या पाडली चिंता...

एका अनुस्वाराने सर्व बदलले ,

जिवंतपणी मी झाली चिता...!!५!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy