STORYMIRROR

Harsha Lohe

Others

2  

Harsha Lohe

Others

!! ओलावा !!

!! ओलावा !!

1 min
80

ओलावा असावा,

हवा हवासा मैत्रीचा..

जणू सडा पडला,

अंगणी माझ्या प्राजक्ताचा...!!१!!


ओलावा भासावा,

मैत्रीमध्ये प्रेमाचा

मनाची तळमळ पाहून,

वाहतो झरा भावनेचा...!!२!!


ओलावा मिळावा,

दुःखात प्रेमळ शब्दाचा..

दुःख विसरण्यासाठी,

आधार जड अंतकरणाचा...!!३!!


ओलावा जपावा,

नात्यातील प्रत्येक धाग्यांचा..

कधी कटू कधी गोड,

अनुभव येतो आठवणींचा...!!४!!


Rate this content
Log in