STORYMIRROR

Harsha Lohe

Others

2  

Harsha Lohe

Others

प्रेमपत्र

प्रेमपत्र

1 min
51

सोबत नसून देखील मनाने खूप खूप जवळ असलेल्या प्रेमात भावना व्यक्त करण्यासाठी हे पत्र. "पत्र म्हणजे आपल्या भावना शब्दात मांडण्याची संधी" प्रेमाची अनुभूती प्रत्येक नात्यात ही वेगळी असते. असच एक छोटंसं काव्यरुपी पत्र लिहिण्याचा माझा प्रयत्न. कसा वाटला नक्की सांगा


प्रेम तुझं मनात साठवलं,

कारण

या प्रेमात वावगं असं मला कधी वाटलच नाही,

प्रेम तुझं मुळीच चुकीचं नाही,

पण

समजणाऱ्याला ते कधीच उमजणार देखील नाही!!१!!


क्षणा क्षणाला ते पोटात पचवलं,

कारण

ओठांवर आणलं तर कोणी समजणार नाही,

प्रेम तुझं शरीरावर मुळीच नाही,

पण

मनाच्या प्रेमाला कोणीच कधी जाणणार देखील नाही!!२!!


आपलं प्रेम पवित्र आहे,

कारण

संवाद फक्त मनाचा मनाशी आहे,

वागणं, बोलणं तुझं खरच चुकीचं नाही,

पण

समाज नावाच्या ग्रहणाने कोणालाच सोडलं देखील नाही!!३!!


प्रेमानी हाक मारतो ना मला?

कारण

मनाने दूर तू कधी गेलाच नाही,

बघितले डोळ्यांनी एकदाही नाही,

पण

जवळ नसल्याचं कधी भासवत देखील नाही!!४!!


Rate this content
Log in