STORYMIRROR

Harsha Lohe

Romance

3  

Harsha Lohe

Romance

!! साठवलेले क्षण !!

!! साठवलेले क्षण !!

1 min
135

 भावना मनी दाटली ,

तुझ्या माझ्या सहवासाची..

दाटलेल्या धुक्यात हरवली ,

भेट अनमोल क्षणांची...*!!१!!*


स्पर्श झाला मनाला ,

आठवणीत हा जीव आसक्त..

ऋतू हिरवा बहरला ,

जणू अंगणी माझ्या प्राजक्त...*!!२!!*


सुख दुःखाच्या हिंदोळ्यावर ,

झुलते आयुष्याचा झुला..

जखमा झाल्या मनावर ,

कळणार कधी तुला...*!!३!!*


तुलाही झाल्या असह्य वेदना ,

माहिती आहे रे मला..

कशी घालू फुंकर सांगना ,

होईल प्रेमाची शाश्वती तुला...*!!४!!*


सप्ने रंगवली दोघांनी ,

संसाराच्या सुखासाठी..

केला विरोध सर्वांनी ,

प्रेम आपलं निभवण्यासाठी...*!!५!!*


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance