प्रेम तुझं माझं..
प्रेम तुझं माझं..
प्रेम तुझं माझं
क्षितिजावरील इंद्रधनूसारखं
रंगाची उधळण करणार
सुख-दुःखाचे रंग सारे
आयुष्यात भरणारं
प्रेम तुझं माझं
गुलाबावरील दवासारखं
नाजूक भावना एकमेकांच्या
अलगदपणे सावरणार
प्रेम तुझं माझं
आकाशाला भिडणार
आयुष्याच्या सुख दुःखातील कणाकणातून घडणारं
प्रेम तुझं माझं वादळातही तारणार
विश्वासाचा किनारा होऊन लाटांना मागे सारणारं
प्रेम तुझं माझं
अबोल नजरेतून ही
खूप काही बोलणार
तू नेहमी आहे सोबत माझ्या हा विश्वास मला देणारं

