STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Romance

3  

Mrs. Mangla Borkar

Romance

जीवनासाठी जोडीदार

जीवनासाठी जोडीदार

1 min
355

आयुष्यात एक तरी, जोडीदार हवाच!


एकमेकांना, दिलेल्या दुःखांवर

एकमेकांसोबत, घालवलेल्या

अनेक आनंदी क्षणांचा, लेप लावण्यासाठी..

आयुष्यात एक तरी, जोडीदार हवाच!


अनेक जुन्या, आठवणींनी आणलेले

एकमेकांच्या, डोळ्यातील आनंदाश्रु पुसण्यासाठी…..

आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!


आयुष्यात पुढे येणारया, अनेक दुःखी क्षणांच्या वेळी

एकमेकांच्या हातात, चेहरा लपवून मनसोक्त रडण्यासाठी!

आयुष्यात एक तरी, जोडीदार हवाच!


प्रत्येक दुःखी, क्षणानंतर येणारया आनंदी क्षणात

एकमेकांचा, हात धरण्यासाठी एकमेकाला,

 सावरण्यासाठी…………

आयुष्यात एक तरी, जोडीदार हवाच!

   


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance