vivah
vivah
दोन घराणे
नवीन माणसे
जुळतात कसे
गोड तराणे
नवीन नाते
विवाह हा तर
मुलीचे सासर
जोडले जाते
चुडा हिरवा
जोडवी बोटात
मने जुळतात
शृंगार नवा
सर्व अंगाला
हळद लागते
नवरी सजते
नवरा आला
सौभाग्यावती
माप ओलांडते
लक्ष्मीही शोभते
सख्या संगती
मने जुळता
चाहूल सुखाची
मधुर स्वप्नाची
साथ मिळता

