आई मला वाचव
आई मला वाचव

1 min

234
सांग काय माझी चुकी
वाटे मला यावे जगती
मिळावी माता पित्याची प्रिती
जुळवावी माणुसकीची नाती
येवू दे थोडीसी दया
दे मला थोडीसी माया
वाहिन मी अमृताची गया
हो तु मला वाचवाया
अस्तित्व नकोसे का झाले
विनाकारण मला का मारता
माझ्या पोटी जन्माला येईल
वंशाचा दिवा तुम्ही जो म्हणता
सांगा ते गाव कोणते
देईल तुम्हा शांत सावली
संकटी तारेल हीच माऊली
उमलू द्या गर्भातील कळी