लेक माझी होशील का
लेक माझी होशील का

1 min

215
येशील लक्ष्मीच्या पावलांनी
माप ओलांडून घरात,
सुन म्हणुन आलीस तरी
लेक माझी होशील का?
तुझ्याच रूपात पाहते
तुझ्याच रूपात पाहते
लेकीस मी सदा
माया मुलीची देवून
आनंदी ठेवीन सर्वदा
मन जरी वेगळी आपली
एकमेकां समजून घेवूत
माय लेकी सारख
दोघी मिळून राहत जावूत
सुन नव्हे कन्या माझी
जेवढ माझ प्रेम मुलावर
थोडस जासतच तुला
लक्ष मात्र ठेव संसारावर
घरट्याकडे ही लक्ष
असु देत बाळा
सुन म्हणुन आलीस
तरी लेक बनून रहा