भेट तुझी माझी
भेट तुझी माझी
पुन्हा व्हावी भेट नव्याने
जुन्याच आड वाटेवरती
यावा भेटीस बहार नवा
नजराही जणू भिरभिरती
नव्या भेटीचे रंग नवे
सुमधुर संध्या गुणगुणावी
प्रीतपाखरे सागरकिनारी
बघण्या तुजला विहारावी
यावा उधाण लाटांस
तुझं माझं मिलन पाहून
गुणगुणावं मी नव्याने
गीत प्रीतीचे ओठी घेऊन
साज शृंगार यावी लेऊन
मंजुळ वारा सोबत घेऊन
सांज सावळी सागर किनारी
मावळावी प्रीतरंग पिऊन
प्रीत जुनी बहार नवा
असावा तुलाही हवा हवा
रात नशीली खेळ नवा
भास म्हणू की आभास नवा

