डोळ्यात माझ्या
डोळ्यात माझ्या
1 min
167
डोळ्यात माझ्या भावनांचा पूर आला
बघताच तुला मी हृदयी घाव झाला
मोहोळ चांदण्यांचे सजले मनांगणी
तुझ्या प्रीतीत माझं आकाश रिता झाला
कोसळल्या धारा त्या प्रीत पावसाच्या
बघून तुला तो पाऊस पसार झाला
दिसले ओलावलेले मलाच डोळे माझे
पाहताच क्षणी तुला नयनांना हर्ष झाला
ही भेट तुझी माझी अवचित घडलेली
तुला पाहतांना मनी किलबिलाट झाला
नजरकैद झालीस माझ्या डोळ्यात तू
मनाच्या कोंदनी तुझं चित्र साकार झाला
नातं तुझं नि माझं अतूट बंध रेशमाचे
हा खेळ भावनांचा प्रीतीत कैद झाला
दिसले मला तुझ्या डोळ्यात प्रीत वारे
वाऱ्यांना त्या गुलाबी आनंद अपार झाला
