तुझं काय..?
तुझं काय..?
थांब रं येड्या घरातच जरासा
कशाला फिरतेस रस्त्यावर
लॉकडाऊन आहे तुझ्याचसाठी
जाशील रं स्मशान घाटावर
तू तर जाशील निघून, तुझं काय..?
जरा त्यांचाही विचार कर की..!
म्हातारे आईवडील अन् आजीआजोबा तुझे
लहान मोठी असतील भावंडे तुझी
लेकरं तुझे अन् बायको पण असेलच घरी
तुझ्या पश्चात त्यांचं काय....?
शेवटचं बघता पण येणार नाही रं तुला
कुठली मयत..? अन् कुठली तेरावी...?
डोळ्यातलं पाणी डोळ्यातच आटेल त्यांचं
बंद होईल कंठ येड्या रडून रडून त्यांचं
पण तू कधी दिसणार नाहीस त्यांना
डोळ्यांतील आसवांत त्यांच्या....!
वाचव रं येड्या जीव तुझं
राहून काही दिवस घरीच गप्प...!
जगशील तर लढशील अजून नव्या दमानं
पण नको जाऊ दारात त्याच्या
त्याचं दार म्हणजे देवाघरची वाटच झालीय बघ..!
जिथं देव सुद्धा सापडले बंदिवासात
तिथं तुझं काय रं..? तू तर शेवटी माणूसच
पोटाची भूक भागवता येईल कशीतरी...?
पण जिवंत राहशील तेव्हा न...!
मग थांब रं बाबा घरातच..! घे काळजी...
स्वतःची आणि कुटुंबाची पण
तू सुरक्षित तर राष्ट्र सुरक्षित.....!
