दुःखाश्रू
दुःखाश्रू
दुरावली माणसे नात्यातील
कोरोना तुझ्या येण्यानी
हरवत चालले एकेक इथं
जिथं बनली हवा जीवघेणी
अश्रूभरल्या नयनांनी
वाहावी कितींना श्रद्धांजली
कोंडला जातोय श्वास इथं
माणसावर काय ही वेळ आली
देवा किती करावी विनवणी तुला
बसूनच रोज घरातल्या घरात
कोरोना विरुद्ध मानवाचा
उभा ठाकलाय हा संघर्ष दारात
कोरोनाच्या या महामारीतही
प्रत्येकालाच आहे जीव प्यारा
माणूसच लुटतोय माणसाला
मोहमायेचा किती रे हा पसारा
देवा अजून किती लढायचं
अन् लढता लढता रडायचं
घरातच दडून बसायचं की
मरता मरताच जगायचं
