शिल्लक उरावे जरासे
शिल्लक उरावे जरासे
जगता जगता जीवन जगावे जरासे
जगतानाही शिल्लक उरावे जरासे
जन्म आहे तिथं मृत्यू अटळ आहे
मरूनही पुन्हा शिल्लक उरावे जरासे
जगूनही पुन्हा राहील जगणे बाकी
जगतानाच मनसोक्त जगावे जरासे
दुःखाशिवाय सुखही असेल पोरके
करावे सुखदुःखाला आपले जरासे
राग लोभाला इथं नसावीच थारा
मान सन्मानाला इथं जपावे जरासे
जीवनरूपी महानाट्याचे रंगमंच निराळे
भूमिकेत अजरामर होऊन बघावे जरासे
माणूस म्हणून माणसा जन्मलास इथं
माणूस बनून माणुसकी जपावे जरासे
येता जाता काही नेणार नाही सोबत तू
आठवणी रुपात शिल्लक उरावे जरासे
