चाफा फुलला
चाफा फुलला
1 min
188
चाफा फुलला
मनी वसला
बघून मला
स्मित हसला
धवल रंग
फुलांत दंग
सुवर्ण छटा
पाकळ्या संग
तो बहरला
बोलू लागला
फुलता क्षणी
गंध चढला
मनी सांडला
दरवळला
गंध चाफ्याचा
मोह दाटला
पाने हिरवी
मोह भरवी
बघूनी चाफा
भान हरवी
मनांगणात
नभांगणात
फुलला चाफा
हृदयी क्षणात
